लो. टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भावपूर्ण श्रद्धांजली!

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मार्गदर्शक व्यक्तित्व हरपले!
मुंबई दि. १६ जुलै : लोकमान्य टिळकांचे पणतू, केसरी’चे विश्वस्त-संपादक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांच्या निधनाने सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मार्गदर्शक व्यक्तित्व हरपले, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या.
डॉ. दीपक टिळक यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, डॉ. दीपक टिळक यांनी टिळक घराण्याचा वारसा सर्मथपणे चालवत शिक्षण, पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात अत्यंत मोलाचे योगदान दिले. लोकमान्य टिळक यांची विचारधारा आणि मूल्यांची परंपरा त्यांनी कृतिशीलतेने पुढे नेली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक उन्नतीमध्ये त्यांची भूमिका अत्यंत मोलाची ठरली. दैनिक केसरीचे विश्वस्त संपादक म्हणून पत्रकारीतेसह विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांना त्यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले.