महाराष्ट्र
वनसंवर्धनाच्या अचाट प्रयोगांचे दर्शन!
गेली तीस वर्षे (१९९४-२०२४) जंगलं-देवरायांमध्ये खूप धडपड, मेहनत आणि संयमाच्या माध्यमातून वनसंवर्धनाचे अचाट प्रयोग ‘प्रत्यक्ष जमिनीवर’ यशस्वीपणे राबविणाऱ्या अप्लाइड एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाऊंडेशन (AERF) या संस्थेच्या उत्तर सह्याद्री अंतर्गत येणाऱ्या कोकणातील देवरुख (संगमेश्वर) भागातील काम जवळून पाहाण्याचा-अनुभवण्याचा योग (१४-१५डिसेंबर) आला.
या संस्थेने ‘सहभागी संवर्धन’ किंवा ‘समुदाय आधारित संवर्धन’ कामाचे फ्रेमवर्क तयार केले आहे. मानवी जीवन बदलवण्याची क्षमता असलेल्या आणि यावर्षी तीन दशकांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या या संस्थेच्या अनोख्या जंगल संवर्धन विषयक उपक्रमाविषयी सविस्तरपणे लिखाण लवकरच वाचायला मिळेल.
-धीरज वाटेकर