उद्योग जगतमहाराष्ट्रलोकल न्यूजशिक्षण

वीस युवकांना मिळाला अग्नी सुरक्षा प्रशिक्षणाचा थेट लाभ; रोजगाराच्या संधी खुल्या!

  • उरणमध्ये शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या अग्निसुरक्षा प्रशिक्षण उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

उरण दि ३ (विठ्ठल ममताबादे ) : शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष – उरण विधानसभा आणि शिवसेना उरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “नागरी संरक्षण: जीवनरक्षक अग्निसुरक्षा प्रशिक्षण” उपक्रम यशस्वीपणे पूर्ण झाला असून उरण तालुक्यातील २० युवकांना या उपक्रमाचा थेट लाभ मिळाला आहे.

या प्रशिक्षणाद्वारे युवकांना शासनमान्य प्रमाणपत्र देण्यात आले असून फायर आणि सेफ्टी या वाढत्या क्षेत्रात त्यांना नोकरीसाठी पात्रता मिळाली आहे. या प्रशिक्षणात तांत्रिक शिक्षणासोबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसाठी विशेष सत्रे घेण्यात आली होती.

तालुका संघटक ओमकार विजय घरत यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमासाठी स्थानिक तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. घरत म्हणाले की आजच्या तरुणांना दिशा देणं आणि रोजगारक्षम बनवणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे. हा उपक्रम म्हणजे त्याच दिशेने टाकलेलं एक ठोस पाऊल आहे.या यशस्वी उपक्रमामध्ये मनोहरशेठ भोईर -माजी आमदार व जिल्हा प्रमुख रायगड ,शशिकांत डोंगरे– जिल्हा संघटक शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष,सुनीत पाटील– उपजिल्हा प्रमुख शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष,नरेश राहाळकर– उपजिल्हा प्रमुख रायगड,संतोष ठाकूर – तालुका प्रमुख, उरण,दीपक भोईर – तालुका संपर्कप्रमुख, उरण,गणेश शिंदे – माजी नगराध्यक्ष व गटनेते उरण विधानसभा,संदीप जाधव – शहर प्रमुख शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष या सर्व तसेच इतर अनेक मान्यवरांचा मोलाचा सहभाग आणि पाठिंबा लाभला. त्यांच्या सहकार्यामुळेच उपक्रम प्रभावीपणे पार पडू शकला असे सांगत ओमकार घरत यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.

प्रशिक्षण पूर्ण करणारे युवक आता मुंबई, नवी मुंबई, रासायनिक उद्योग क्षेत्र तसेच औद्योगिक वसाहतींमध्ये कार्य करण्यासाठी पात्र झाले असून, अनेक कंपन्यांमध्ये त्यांना संधी उपलब्ध होणार आहे.स्थानिक पातळीवर नागरिकांनी व पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत यास अधिक व्यापक स्वरूप देण्याची मागणी केली आहे. आयोजकांनी पुढील महिन्यात दुसऱ्या टप्प्याचे प्रशिक्षण घेण्याचा मानसही व्यक्त केला.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button