वेश्वी येथून १७ वर्षीय युवती बेपत्ता

- माहिती मिळाल्यास उरण पोलीस स्टेशनला कळविण्याचे आवाहन
उरण दि ३० (विठ्ठल ममताबादे) : दि २०/६/२०२४ रोजी रात्री ७ वाजता उरण तालुक्यातील वेश्वी गावातून १७ वर्षाची तरुणी कु. रिवानी अजय सिंग ही अचानक बेपत्ता झाली आहे. बालवयाचा,अज्ञाणाचा फायदा घेवून फूस लावून तिला अज्ञात आरोपीने पळवून नेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. या संदर्भात भारतीय दंड विधान संहिता कलम ३६३ अंतर्गत सदर अज्ञात व्यक्ती विरोधात उरण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेपत्ता मुलीचा तपास उरणचे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कोते (पाटील ) यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिरुध गीजे करीत आहेत.
कु. रिवानी अजय सिंग वय १७ वर्षे रा. वेश्वी गाव, ता. उरण जि. रायगड मो. नं. ८२९१६१५४७४, रंग-सावळा, उंची-४.५ फुट, केस काळे, नाक-लांब, डोळे – काळे चेहरा-गोल, अंगाने सडपातळ, अंगात गुलाबी रंगाचा टॉप, गुलाबी रंगाची लेगीन्स, भाषा मराठी, हिंदी या वर्णनाची मुलगी दिनांक २०/६/२०२४ रोजी रात्री ७ वाजता बेपत्ता झाली असून मुली संदर्भात कोणाला माहिती मिळाल्यास किंवा ही अल्पवयीन मुलगी कुठे दिसल्यास त्वरित उरण पोलिस ठाण्यात कळवावे, असे आवाहन उरण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिरुद्ध गीजे यांनी केले आहे.