महाराष्ट्र
शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर यांच्या प्रचार नियोजनार्थ पाली येथे बैठक
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक
रत्नागिरी : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे युतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचार नियोजनाबाबत बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी पाली (रत्नागिरी) येथे आयोजित करण्यात आली होती.
यावेळी, राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी रायगड – जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडणुकीत युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला.