शिवाज्ञा संघ MPL 2024 चा विजेता ; मालिकावीर ठरला जितेश भोईर
- DRV चा ब्रँड जितेश भोईर ठरला बाईकचा दावेदार
उरण (विठ्ठल ममताबादे ) : एकाच गावातील खेळाडूंची लिलाव पद्धतीने 16 संघांची निवड करून त्याची लीग ठेवली जाते ती उरण तालुक्यातील मानाची टेनिस क्रिकेट स्पर्धा समजली जाणारी “मोठीजुई प्रीमियर लीग” 2024 च्या चौथ्या पर्वाचे दिमाखदार आयोजन ए. व्ही. स्पोर्ट युवा प्रतिष्ठान मोठीजुई च्या माध्यमातून केले गेले होते. या पाच दिवसीय खेळल्या गेलेल्या स्पर्धेचा 31 डिसेंबर रोजी अंतिम सामना झाला आणि ही स्पर्धा निर्विघ्न आणि दिमाखदार पार पडली.
एकूण सोळा संघ मालकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता त्यात आपल्या खेळवृत्तिने अंतिम चार संघ टॉप 4 मध्ये पोचले त्यापैकी शिवाज्ञा ईटरप्रायझेस संघ प्रथम क्रमांक,प्रिन्सि प्रिता इलेव्हन संघ द्वितीय क्रमांक,SSD इंडियन संघ तृतीय तर काव्य ईटरप्रायझेस संघ चतुर्थ क्रमांक चा मानकरी ठरला.DRV संघातून आपल्या टेनिस क्रिकेट च्या कारकिर्दीला सुरुवात करून आपल्या दमदार खेळवृत्तीने उरण तालुक्यात विविध स्पर्धा खेळत आपल्या नावाचा एक ब्रँड तयार केला आणि आपल्या आर्थिक परिस्थिती वर मात करीत व्यावसायिक क्रिकेट ला सुरुवात केली.
यंदाच्या MPL मध्ये तीन अर्धशतकी च्या बहारदार खेळीने 8 विकेट संपादन करून 22 षटकार अश्या तब्बल 288 धावसंख्या काढून MPL 2024 या स्पर्धेत मालिकावीर साठी बाईक चा हकदार ठरला जितेश नंदकुमार भोईर.
या लीग स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज म्ह्णून यश भरत पाटील याला सायकल, उत्कृष्ट फलंदाज हेमंत माया पाटील याला सायकल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हर्ष बाबू भोईर याला शूज, रायझिंग स्टार साठी हर्ष रमेश भोपी याला उत्कृष्ट चषक देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेसाठी स्मार्टसिटी डेव्हलपर्सचे प्रवीण घासे, सरपंच दिपकदादा भोईर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.