शेतकरी कामगार पक्षातर्फे सावित्रीबाई फुले जयंती
उरण (विठ्ठल ममताबादे ) : मंगळवार दि ३/१/२०२३ रोजी सकाळी ११ वा. शेतकरी कामगार पक्ष कार्यालय कोटनाका, मिठागर पेठा उरण येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.
महिला अध्यक्षा सीमा अनंत घरत यांच्या अध्यक्षतेखाली शेकापचे खासदार स्वर्गीय केशवराव धोडगे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली . शेकापचे माजी उपसभापती महादेव बंडा, सरचिटणीस यशवंत ठाकूर, उरण विधानसभा अध्यक्ष मयुर सुतार, चंपाताई पाटील,शेकाप महिला केगाव पंचागण अध्यक्षा सविता म्हात्रे,महालन अध्यक्षा रेखाताई घरत, ठाकूर,शंकर भोईर ,के .एस .ठाकूर, बा. ध. पाटिल, मु. ग. पाटिल, मनोहर पाटील,नागाव ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र म्हात्रे,निलेशभाई पाटील आदी मान्यवर तसेच शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, मिठागर कामगार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.