महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
गरीब नवाज रिलीफ फाऊंडेशनतर्फे रत्नागिरी शहर परिसरात वृक्षारोपण

रत्नागिरी : येथील गरीब नवाज रिलीफ फाउंडेशनतर्फे नुकतेच रत्नागिरी शहर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये कोकणनगर, बाजारपेठ, परिसरातील नागरिकांनी सहभाग घेतला.
वृक्षारोपण कार्यक्रमासाठी गरीब नवाज रिलीफ फाउंडेशनचे अध्यक्ष फारुख जरीवाला यांनी सांगितले की, वृक्षारोपण ही काळाची गरज आहे, यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो तसेच हवा देखील शुद्ध राहते.

या कार्यक्रमासाठी गरीब नवाज रिलीफ फाउंडेशनचे रत्नागिरीचे अध्यक्ष फारुख जरीवाला, इसाक मेमन, साजिद मेमन इतर सदस्य उपस्थित होते.