उद्योग जगतब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीयराष्ट्रीयलोकल न्यूजसायन्स & टेक्नॉलॉजी
शेतीमध्ये जपानी तंत्रज्ञान आणणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय शेतीमध्ये जपानी तंत्रज्ञान वापरून शेती क्षेत्राचा विकास साधण्यासह एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशातील एक अब्ज लोकांना त्याचा लाभ होईल या दृष्टीने राज्य सरकारचे धोरण असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
जपानी एम २ लॅबो संस्थेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. जपानचे तंत्रज्ञान शेती क्षेत्रात आणून कृत्रिम बुद्धिमत्तेआधारे १ अब्ज लोकांना मदत करायची आहे. याद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्र्यांनी या भेटीवेळी बोलताना सांगितले.