ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीय
श्री रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त राज्यात २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर
मुंबई, दि. १९ : श्री रामलल्ला प्राण- प्रतिष्ठा दिनानिमित्त राज्य सरकारने सोमवार, दि.२२ जानेवारी २०२४ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतची अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केली आहे.
येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाचं महाराष्ट्रातील दिग्गजांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात एका गावाच्या सरपंचाला कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे.
हिवरे बाजार गावचे सरपंच पोपटराव पवार यांना अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेपनेचे निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना देखील या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे.