श्लोक पाटील महाराष्ट्र सुंदरी स्पर्धेत प्रथम
उरण दि 2(विठ्ठल ममताबादे ) : उरण येथील प्रख्यात सामाजिक कार्यकर्ती, कुटुंबिनी महिला मंडळाची अध्यक्षा आणि दि चाइल्ड प्रोडिगी इंटरनॅशनल प्रे स्कूलची संस्थापिका तसेच संचालिका सौ.श्लोक निखिल पाटील यांनी महाराष्ट्र सुंदरी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविला आहे.
राष्ट्रीय साज इंटरटेनमेंट च्या आयोजिका जयश्री रगडे यांनी ताज महल हॉटेल, मुंबई येथे कॅन्सर ग्रस्त रुग्णाला मदत निधि संकलन करण्याच्या उदात्त हेतुने फैशन शो, मॉडलिंग व रोड मॉडलिंग राज्यस्तरीय महाराष्ट्र सुंदरी स्पर्धेचे आयोजन दि. 24 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबई येथे केले होते.यात 30 महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. पैकि केवळ पाच महिलांना विजयी घोषीत करून त्यांना प्रमुख पाहूण्या प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे यांच्या हस्ते महाराष्ट्र सुंदरीचा मुकुट घालून सन्मान केला.
या स्पर्धेत उरणची कन्या सौ. श्लोक निखिल पाटील ही प्रथम क्रमांकाने महाराष्ट्र सुंदरीने सन्मानित झाल्याने सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.श्लोकचे आई-वडिल सुमनताई तोगरे व संग्राम तोगरे यांनी श्लोकला नेहमी प्रोत्साहन दिले. त्यामुळे श्लोक यांच्यासह तीच्या आई वडिलांचेही सर्वत्र कौतुक होत आहे.