महाराष्ट्रराष्ट्रीयशिक्षण
संविधानाने दिलेला अधिकार वाचवायचा असेल तर सावित्रीच्या लेकींनी पुढे यायला पाहिजे

- कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे आवाहन
उरण दि ४ (विठ्ठल ममताबादे ) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना संविधानात दिलेले अधिकार अबाधित ठेवायचे असतील तर महिलांनी आजच्या बदलत्या राजकारणाचा अभ्यास करून पुढे यायला पाहिजे असे आवाहन आपल्या मनोगतात महेंद्र घरत यांनी केले.
राष्ट्रमाता जिजाऊ, पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले व फातिमा बेग यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त गौरव स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन संविधान महोत्सव समिती उलवे नोड, नवी मुंबई यांच्यातर्फे करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी कामगार नेते महेंद्र घरत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अतिशय स्तुत्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल संविधान महोत्सव समितीचे त्यांनी अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी मोठया प्रमाणात महिला भगिनी उपस्थित होत्या.