सचिन तांडेल मेमोरियल फाउंडेशन द्रोणागिरी भूषण पुरस्कार २०२२ ने सन्मानित
उरण दि २१ (विठ्ठल ममताबादे ) : रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील कला क्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रसिद्ध द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन या संघटने मार्फत उरण तालुक्यातील कळंबुसरे गावातील सेवाभावी संस्था म्हणून सुपरिचित असलेल्या सचिन तांडेल मेमोरियल फाउंडेशन या संस्थेला द्रोणागिरी भूषण पुरस्कार २०२२ ने मंगळवार दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजी सन्मानित करण्यात आले.
दरवर्षी प्रमाणे होणाऱ्या या यंदाच्या २२ व्या युवा महोत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व विविध क्षेत्रातील व्यक्तिं,संस्था मधील ३५ नामांकनातून संस्थेला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सचिन तांडेल मेमोरीयल फॉउंडेशन तर्फे गेल्या काही वर्षा पासुन अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले असून त्यामध्ये प्रामुख्याने रक्तदान शिबीर, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप,आदिवासी वाडी येथे जिवनावश्यक वस्तू वाटप,वृक्षारोपण आणि त्यांचे संवर्धन, पूरग्रस्तांसाठी थेट मदत,अक्षर भिंत उपक्रम, मोफत आरोग्य तपासणी शिबीर, इको फ्रेंडली मखर स्पर्धा, तरुणांना रोजगार मार्गदर्शन शिबीर, श्रमदान,विद्यार्थ्यांनचा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचे उल्लेखनीय कामगिरी बद्दल गुणगौरव, कोरोना महामारीच्या काळात विविध क्षेत्रातील सेवा देणार्या डॉक्टर आणि पोलिस यांचे संस्थेकडून सन्मान करण्यात आले. संस्थेच्या सर्व सभासदांकडून असे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत.त्यामुळे सदर द्रोणागिरी पुरस्कार या संस्थेला देण्यात येत असल्याची माहिती द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत यांनी दिली.
सदर पुरस्कार समारंभात पुरस्कार स्वीकारण्यास संस्थेचे सचिव आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त रत्नाकर केणी सर त्याच बरोबर संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात आवर्जून योगदान करणारे आदर्श व्यक्तिमत्त्व बळीराम पाटील हे उपस्थित होते. भविष्यात सदर पुरस्कार संस्थेस अनेक समाजोपयोगी कार्य करण्यास प्रेरणा देत राहील असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार तांडेल यांनी केले.