सर्जेराव शेलार यांची आत्महत्या की खून?

- द्रोणागिरी रेल्वे स्टेशन परिसरात आढळला मृतदेह
- शरीराचे दोन तुकडे ; पोलिसांकडून अधिक तपा सुरु
उरण दि २४ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील द्रोणागिरी रेल्वे स्टेशनजवळ २४ मे २०२५ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नागरिकांना एकाचा मृतदेह आढळून आला आणि खळबळ उडाली. ही बाब सोशल मीडियावर त्वरित व्हायरल झाली. मृत्यू कोणाचा झाला याबाबत पोलिसांनी तपास केला असता तो उरण तालुक्यातील बोकडविरा येथील सर्जेराव शेलार (अंदाजे वय ६०) यांचा असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.

ही घटना ही आत्महत्त्या आहे की खून आहे, याचा अधिक तपास उरण पोलीस व रेल्वे पोलीस प्रशासनाकडून सुरु आहे. उरणहून बेलापूरकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनखाली सापडून सर्जेराव शेलार यांचा मृत्यू झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
या घटनेचा अधिक तपास पोलीस करत असून या घटनेमुळे उरणच्या नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.