सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उद्या जिल्हा दौऱ्यावर
रत्नागिरी दि. 31 : राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवारी 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 6.20 वाजता पनवेल रेल्वेस्थानक येथे आगमन व जनशताब्दी एक्सप्रेसने चिपळूण प्रयाण.सकाळी 9.40 वाजता चिपळूण रेल्वे स्थानक येथे आगमन व पाटपन्हाळे, ता. गुहागरकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता पाटपन्हाळे, ता. गुहागर येथे आगमन व कोकण पदवीधर निवडणूक आणि ग्रामपंचायत निवडणूक आढावा बैठकीस उपस्थिती. (स्थळ:- श्री. पुजा मंगळ कार्यालय, पाटपन्हाळे, ता. गुहागर) दुपारी 1.30 वाजता राखीव (हॉटेल सनराईज, धामणी, ता. संगमेश्वर) दुपारी 2.45 वाजता रत्नागिरीकडे प्रयाण. दुपारी 4 वाजता रत्नागिरी येथे आगमन व कोकण पदवीधर निवडणूक आणि ग्रामपंचायत निवडणूक आढावा बैठकीस उपस्थिती.(स्थळ:- रत्नागिरी जिल्हा भाजपा कार्यालय, आठवडा बाजार, रत्नागिरी) सांयकाळी 6.30 वाजता रत्नागिरी येथून केसरी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण.