महाराष्ट्रलोकल न्यूज
सालपे केळवली येथे २६ सप्टेंबरला राज्यस्तरीय चिखल नांगरणी स्पर्धा
लांजा : लांजा तालुक्यातील सालपे केळवली येथे ओम साई रिक्षा संघटना शिपोशी आणि केळवली ग्रामस्थ यांच्यातर्फे राज्यस्तरीय चिखल नांगरणी स्पर्धेचे आयोजन मंगळवार दि. २६ सप्टेंबर २०२३ रोजी करण्यात आले आहे.
या स्पर्धेत बैलजोडी मालकांनी अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शाहनवाज सारंग, सुनील कोटकर, अजय कोटकर, प्रकाश मजलकर,अक्षय सुर्वे, महेंद्र खुर्द,फारुख सारंग, असलम लांजेकर, विकास कोलपटे, मुकेश भालेकर यांनी केले आहे.