सिंधूरत्न समृध्द योजनेचा लाभ घेण्याचे मच्छीमारांना आवाहन
रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये सिंधूरत्न समृध्द ही पथदर्शी योजना राबविण्यात येणार आहे. सन 2022-23 अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या बिगर यांत्रिकी नौका यांत्रिकीकरण करणे, इन्सुलेटेड वाहन, मच्छिमार महिलांसाठी ई-स्कूटर/शीतपेटी, फिरते मासे विक्री केंद्र (तीन चाकी टेम्पो विथ डिप फ्रिजर), मच्छिमारांना सोलार ड्रायर पुरविणे, बिगर यांत्रिकी नौका बांधणे इत्यादी योजनांचा लाभ घेण्यासाठी विहीत कागदपत्रांसह अर्ज सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) रत्नागिरी यांनी केले आहे.
योजनेच्या अधिक माहितीसाठी इच्छुकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील परवाना अधिकारी, सागरमित्र, सुरक्षारक्षक यांचेशी संपर्क साधावा व प्रस्ताव सादर करावेत.
सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (रत्नागिरी)- 7020323880, परवाना अधिकारी (रत्नागिरी) – 7887889092, परवाना अधिकारी (जयगड) – 8108524879, परवाना अधिकारी (गुहागर)- 9405085615, परवाना अधिकारी (दाभोळ) – 8010473650, परवाना अधिकारी (साखरीनाटे)- 9405910503.तसेच अधिक माहिती व संपर्कासाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां.) रत्नागिरी, दूरध्वनी / फॅक्स क्र. 02352 / 233726 Email:-acfrtn@rediffmail.com येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.