जगाच्या पाठीवरमहाराष्ट्रराष्ट्रीयस्पोर्ट्स

सिहान राजू गणपत कोळी यांना ६१ व्या वर्षी मलेशियामध्ये ६ डिग्री ब्लॅकबेल्ट प्रदान

उरण (विठ्ठल ममताबादे ) : नुकत्याच झालेल्या ५० व्या गोल्डन ज्युबली ॲनीवरसरी गोशीन-रियु कराटे फेडरेशन मलेशिया आयोजित कराटे स्पर्धा, ब्लॅकबेल्ट परिक्षा, पंच परिक्षा व ११ ते १४ डिसेंबर २०२४ असे चार दिवसाचे शिबिर मेटॉवर हॉटेल सिल्का कोललमपूर मलेशिया येथे आयोजीत करण्यात आले. सिहान राजू गणपत कोळी यांनी मास्टर काता सोचीन व गोज्युशियोशो सादर करून ग्रँडमास्टर सोके क्लेमनसु प्रमुख परीक्षक व पाच गोशिनरियुचे सिनियर परिक्षक यांच्यावर प्रभाव पाडून परिक्षेत वयाच्या ६१ व्या वर्षी ६ डिग्री ब्लॅकबेल्ट उत्तीर्ण झाले. त्यांनी पंच परीक्षाही उत्तीर्ण केली.

सिहान. राजु गणपत कोळी हे गोशिनरियु कराटे अँसोशिएशन इंडियाचे अध्यक्ष आहेत. त्यांना सिहान वसंतन के डब्लूकेएफ लायसन कोच सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, वियतनाम, जकारता, इंडीयाचे गोशिनरियुचे कोच यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले.

सिहान राजू कोळी, सेन्साय-गोपाल म्हात्रे , सेन्साय-राकेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहीत शरद घरत याने उत्तम कामगिरी करत या स्पर्धेत कास्य पदक पटकावले. त्याचे सर्वांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. सिहान-राहुल तावडे, सिहान-मतीआनंद, सेंसाय आनंद खारकर, सेंसाय -कृष्णा पाटील , भुपेंद्र माळी, रेश्मा माळी, राजेश कोळी, परेश पावसकर, अंजा माने, अमिता घरत, आमिशा घरत, भूषण म्हात्रे, अनिष पतिल, शुभम ठाकुर, विग्नेश कोळी ॲड. नितिन मोहिते, ऍडव्होकेट शितल गणेशकर, निकिता कोळी, विनय पाटील, कृषाणु कोळी (टीम मैनेजर), सुलभा राजु कोळी या सर्वांच्या सहकार्यामुळे सिहान राजूकोळी यांना यश प्राप्त करता आले आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button