सुरक्षित वाहतुकीसाठी रेल्वेने मे-जूनमध्ये काढला तब्बल १.५५ लाख घनमीटर गाळ आणि कचरा
मध्य रेल्वेचे पावसाळ्यात गाड्या सलग आणि सुरक्षित चालवल्या जाव्यात यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न
मुंबई : मध्य रेल्वेने या पावसाळ्यात आपल्या उपनगरी आणि मेल/एक्स्प्रेस गाड्यांची सुरळीत आणि व्यत्ययमुक्त सेवा सुनिश्चित करण्यासाठी पावसाळ्याची तयारी केली आहे.
गाड्या सुरळीत चालवण्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या आव्हानांपैकी एक म्हणजे रेल्वे रुळांवर स्वच्छता राखणे. रुळांवर टाकण्यात आलेला चिखल आणि कचरा केवळ रुळांनाच विस्कळीत करत नाही तर त्याखालून जाणारे नाले देखील तुंबतात, त्यामुळे पावसाळ्यात रुळांवर पाणी साचते.
मुंबई विभाग चौवीस तास अथकपणे काम करत आहे जेणेकरून गाळ आणि कचरामुक्त ट्रॅक योग्य प्रकारे असतील.
मध्य रेल्वे टीमने मे ते जून-२०२४ (आतापर्यंत) १.५५ लाख घनमीटर सांडपाणी/कचरा साफ केला आहे, तर मे ते जून-२०२३ या कालावधीत १.३० लाख घनमीटर सांडपाणी/कचरा साफ केला आहे.
पोकलेन (२१०,११०) माऊंट केलेल्या डीबीकेएम आणि जेसीबी मशिनच्या साहाय्याने गाळ काढण्याचे आणि गोळा करण्याचे काम केले जात आहे आणि 2 DBKM, 3 EMU muck spl, 2 muck spl BRN आणि 1 vaccum BRN द्वारा गाळ काढण्याचे काम केले जात आहे.
रेल्वे जनतेला कचरा करू नका किंवा रुळांवर कचरा टाकू नका, असे आवाहन करत असताना, तो कचरा स्वच्छ करण्यासाठी केलेले विविध प्रयत्न हे स्वच्छ वातावरण देण्यासाठी मध्य रेल्वेच्या सततच्या प्रयत्नांचे उदाहरण आहे.