स्पीडी कंपनीजवळील दुकांनांना आग ; वीसहून अधिक दुकाने खाक
उरण (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील JNPT बंदराजवळ असलेल्या व सोनारी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या स्पीडी कंपनी शेजारी असलेल्या दुकांनांना 1 जानेवारी 2023 रोजी रात्री 1:30 च्या सुमारास अचानक आग लागली. लागलेल्या प्रचंड आगीमूळे 20 हून जास्त दुकाने आगित भस्मसात झाली. दुकांनांना लागलेल्या आगीमुळे दुकानातील संपूर्ण साहित्य भस्मसात झाल्याने सदर दुकानधारकांवर बेकारीची कुहाड कोसळली असून या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. JNPT (जे. एन. पी.ए) प्रशासनाने 30 वर्षा पूर्वी स्थानीक भूमीपुत्रांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे या दृष्टीकोनातून स्पीडी कंपनीच्या बाजूला त्यांना जागा देऊन त्यांना दुकान चालविण्यास दिले. या दुकानामूळे या सदर कुटुंबाचा निर्वाह या स्टॉलवरच अवलंबुन होता.आता मात्र हे उदरनिर्वाहाचे साधनच नष्ट झाल्याने आता उदरनिर्वाहाचे कोणतेच साधन उपलब्ध नसल्याने खूप मोठे दुःखाचे डोंगर त्यांच्यावर कोसळले आहे.
या नुकसानग्रस्तांना JNPA प्रशासनाने आर्थिक मदत करावे. त्यांचे पुनवर्सन करावे अशी मागणी सोनारी ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष राकेश कडू यांनी JNPA प्रशासनाकडे केली आहे. नेमकी आग कशामुळे लागली याचा अधिक तपास पोलिस प्रशासनातर्फे सुरु आहे. आग लागल्याचे समजताच तलाठी येऊन त्यांनी जागेचे व नुकसानाचे पंचनामे केले.आग लागल्याचे समजताच घटनास्थळी महेश कडू (माजी सरपंच ),राकेश कडू (सोनारी अध्यक्ष ),पूनम कडू (सरपंच )आणी सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते विकास कडू यांनी भेट देऊन पाहणी केली.
सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले आहे. सुदैवाने या आगीमुळे कोणतेही जिवितहानी झालेली नाही.जेएनपीए कडुन प्रकल्पग्रस्तांना हे दिलेले स्टॉल असून 24 पैकी 20 स्टॉल जळून खाक झाले आहेत.5 बाय 12 आकाराचे हे स्टॉल होते. त्यामूळे स्टॉल धारकांना कोणताच उदयोग धंदा व्यवस्थित करता येत नव्हता.लाईट तसेच पाण्याची सोय सुद्धा येथे नाही. सर्व दुकाने एकमेकांना लागून होते तसेच हे दुकाने 30 वर्षा वर्षा पूर्वीचे तसेच फायबरने बनविलेले होते. त्यामुळे आसपास एखादया सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली असेल असे काही नागरीकांचे म्हणणे आहे.
आगीत आमच्या दुकानाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून आम्हाला आर्थिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी आम्ही जेएनपीटी प्रशासनाकडे मागणी केली आहे. या झालेल्या नुकसान भरपाई व दुर्घटना संदर्भात आम्ही न्हावा शेवा पोलीस ठाणेशी सुद्धा संपर्क साधला आहे. आम्हाला प्रशासनाने न्याय द्यावा ही आमची विनंती आहे.
–दत्तात्रेय कडू, नुकसानग्रस्त पीडित