महाराष्ट्र
हजारो भाविकांच्या उपस्थितीत मार्लेश्वरचा विवाह सोहळा संपन्न
देवरुख : राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री मार्लेश्वर व साखरप्याची गिरिजादेवी यांचा विवाहसोहळा (कल्याणविधी) रविवारी दुपारी १ वाजून ५ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर मोठ्या थाटामाटात व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी उपस्थित भाविकांनी हर हर महादेव… हरहर मार्लेश्वर.. शिवहराचा जयघोष करीत सह्याद्री पर्वतरांगा दणाणून सोडल्या.