डेरवण येथे राज्य स्पर्धेसाठी जिल्हा ज्युडो संघाची निवड

गुहागर : महाराष्ट्र ज्यूडो संघटनेच्या मान्यतेने ५१ वी कॅडेट व ज्युनिअर राज्यस्तरिय ज्यूडो स्पर्धा दि. ४ ते ६ ऑक्टोबर रोजी ऐस. व्ही. जे. सी. टी. क्रीडा संकुल डेरवण या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा हौशी ज्यूडो संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा संघाची निवड नुकतीच गुहागर रंगमंदिर येथे करण्यात आली.
राज्यस्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या जिल्हा संघासमवेत रत्नागिरी जिल्हा हौशी ज्यूडो संघटनेचे पदाधिकारी.
निवडण्यात आलेला संघ पुढील प्रमाणे, मुलगे – चिन्मय दिनेश वराडकर, अखिल निलेश पालशेतकर, प्रिन्स महेंद्र पाटील, पुष्कर शैलेश कनगुटकर, मोहित राजेश पाटील, शुभम दीपक नागे, सक्षम सागर डोणेकर, धीरज सोमताराम परमार, ओम उमेश भोसले, श्लोक गणेश क्षीरसागर, आर्यन समीर गांधी,
मुली – अर्चिता लवू सुर्वे, स्नेहा सचिन घाडगे, श्रावणी अशोक नागे, सई नितीन आंब्रे, सायली स्वप्नील जाधव, दीक्षा दीपक गुरव, सरोज विजय गावणंग, समृद्धी सोमेश चव्हाण, सानिका अरुण सुर्वे, पूर्वा सुहास चव्हाण, सानिका प्रदीप गोंधळी यांची निवड झाली आहे. तसेच प्रशिक्षक म्हणून श्रद्धा चाळके व संघव्यवस्थापक म्हणून तपस्विनी नाटेकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
राज्य स्पर्धे करीता या संघाला सेंसे शैलेश टीळक, शांताराम जोशी, रत्नागिरी जिल्हा ज्यूडो संघटनेचे अध्यक्ष निलेश गोयथळे, उपाध्यक्ष गणेश धनावडे, सचिव नीरज गोयथळे, खजिनदार सोनाली हळदणकर, ज्यूडो प्रशिक्षक – सोनाली वरंडे, समीर पवार , रुतिकेश झगडे, संतोष भोसले यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.