महाराष्ट्रलोकल न्यूज

हरेश धाकल्या तांडेल यांचे निधन 

उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण येथील सामाजिक कार्यकर्ते हरेश धाकल्या तांडेल यांचे शनिवार दि. ७/३/२०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. मृत्यू समयी त्यांचे वय ६५  होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, जावई, नातू , भाऊ असा त्याचा कुटुंब परिवार आहे. अत्यंत मनमिळावू,सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारे प्रेमळ व्यक्तिमत्व असल्याने हरेश तांडेल यांच्या निधनामुळे तांडेल परिवार, मित्र परिवार, नातेवाईक व बालई ग्रामस्थांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

तांडेल परिवार व ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे. कै.हरेश धाकल्या तांडेल यांचा दशक्रिया विधी सोमवार दिनांक १६ मार्च २०२६ रोजी सकाळी ७:३० वाजता श्री क्षेत्र माणकेश्वर उरण येथे तर दिवस कार्य बुधवार दिनांक १८ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता बालई येथील राहत्या घरी होणार आहे. कोणत्याही प्रकारचे दु:खवटे स्वीकारले जाणार नसल्याचे तांडेल कुटुंबीयांनी कळवले आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button