द्रोणागिरी गडावर उद्या तोफगाडा दुर्गार्पण सोहळ्याचे आयोजन
उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील द्रोणागिरी किल्याच्या पायथ्याशी काही दिवसा पूर्वी पुरातन कालीन एक तोफ सापडली होती. सर्व शिवप्रेमींनी विविध संस्था संघटनांनी अथक मेहनत घेउन ही तोफ द्रोणागिरी किल्ल्यावर चढवली. या तोफेचे संवर्धन व्हावे, संरक्षण व्हावे, या दृष्टीकोनातून रविवार दि. 22 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9.30 वाजता किल्ले द्रोणागिरीवर माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्याहस्ते तोफगाडा दुर्गापण सोहळा संपन्न होणार आहे.
सकाळी 9.30 वाजता मान्यवरांचे आगमन, 9:30 ते 9:45 अभिषेक सोहळा,9:45 ते 10:00 ध्वज पूजन, गड पूजन, शस्त्र पूजन, 10:00 ते 10:10 तोफगाडा दुर्गार्पण,10:00 ते 10:25 मान्यवरांचा सन्मान,10:25 ते 10:50 शिवशाहीर वैभव घरत यांचा पोवाडा, 10:50 ते 11:25 मान्यवरांचे मार्गदर्शन, 11:25 ते 11:30 आभार प्रदर्शन, दुपारी 12:00 ते 2:30 भोजन असे विविध उपक्रम यावेळी होणार आहेत. या उपक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. तरी समस्त शिवप्रेमींनी या द्रोणागिरी गडावरील तोफगाडा दुर्गार्पण सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान (उरण विभाग) व शिवराज युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे.