महाराष्ट्र

पेण, पनवेलमधील आदिवासी वाड्यांवर आरोग्यदायी ज्यूससह गृहोपयोगी वस्तू वाटप

उरण दि. ८ (विठ्ठल ममताबादे ): केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था,श्री समर्थकृपा सखी स्वयंसहाय्यता सा.संस्था,जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेल, श्री साई देवस्थान वहाळ, आगरी, कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था या सामजिक संस्थांच्या माध्यमातून आणि राजू मुंबईकर आणि संगिताताई ढेरे यांच्या औदार्यातून पनवेल, पेण तालुक्यातील माडभुवन आदिवासींवाडी, निफाडवाडी या आदिवासी वाड्यांवर डाबर या नामांकित कंपनीच्या रिअल फ्रेश फ्रूट ज्यूसच्या पाकिटांच (ॲप्पल, मँगो, मिक्सफ्रूट एक लिटर ) नारळ पाणी, स्ट्रॉबेरीमध मिक्स, नारायण तेल, डाबर मिस्वाक टूथ पेस्ट आणि सोबतच मिक्स सब्जी मसाला पाकिटांच वाटप देखील करण्यात आले.

सामाजिक कार्याची आवड आणि निवड ही माणसाच्या अंगीकृत स्वभावातून निर्माण होते आणि हे कार्य करण्याकरिता कुठलीही वेळ – काळ पहिली जात नाही तर मनातील प्रबळ इच्छाशक्तीच या अश्या क्षणांना निर्माण करते ! आणि अशाच प्रेरणादायी क्षणांनी आज एक सामाजिक कार्य सजलं ते केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था,श्री समर्थकृपा सखी स्वयंसहाय्यता सा.संस्था,जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेल,श्री साई देवस्थान वहाळ,आगरी, कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था या सामजिक संस्थांच्या माध्यमातून आणि राजू मुंबईकर आणि संगिताताई ढेरे यांच्या औदार्यातून पनवेल पेण तालुक्यातील माडभुवन आदिवासींवाडी, निफाडवाडी या आदिवासी वाड्यांवर हा उपक्रम पार पडला.

या कार्यक्रमा करिता विशेष उपस्थित राहिलेले आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्यचे कार्याध्यक्ष रोहनदादा पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त करतांना अगदी त्या आदिवासीं बांधवांच्या मनातील व्यथानांच हाथ घालून आपल्या पुढे येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करून खंबीरपणे उभं राहून कसं जगावं आणि आपलं आणि आपल्या मुलांबाळांच भविष्य कसं उज्वल करावं याचा कानमंत्र देखील तेथे उपस्थित त्या आदिवासीं बांधवांनां दिला.

केअर ऑफ नेचर सामजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर आणि संगिताताई ढेरे यांच्या औदार्यातून माडभुवन, निफाडवाडी या सर्व आदिवासी वाड्यांवरील आदिवासीं बांधवांना मिळालेली ही आपुलकीची भेट त्या आदिवासी बांधवांच्या आणि चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणारा होता अगदी खडतर प्रवास करून त्या आदिवासी वाड्यांपर्यंत पोहचणे म्हणजे एक दिव्यच म्हणावे लागेल जगण्या करिता लागणाऱ्या मूलभूत गरजांची आणि सुख - सोयींची वानवा असणाऱ्या या आदिवासी बांधवांना सुखकर प्रवासा करिता आजपर्यंत चांगल्या रस्त्यांची सुधा सोय नाही हे चित्र तेथे गेल्यावर निदर्शनास येतं आणि मनाला खूप वेदना देखील होतात.पण आज समाजात अशी सामाजिक दायित्व जपणारी व्यक्तिमत्त्व आपलं अनमोल योगदान देत या आदिवासी बांधवांच्या दुःखावर मायेची फुंकर मारतात हे पाहून मात्र मन सुखावत एवढं मात्र नक्की !... ह्या कार्यक्रमात आदिवासीं बांधवांच्या वतीनं आम्हां सर्वांचं स्वागत केलं ते निफाडवाडीचे माजी सरपंच मारुती कुऱ्हाडे यांनी तर या कार्यक्रमाकरिता प्रमुख उपस्थिती दर्शविली ती केअर ऑफ नेचर सा. संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर आणि रोहनदादा पाटील( कार्याध्यक्ष - आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य) यांची तर सोबतच विलासजी ठाकूर (कॉन सल्लागार), अनिल घरत (उरण तालुका सचिव आगरी, कोळी, कराडी संघर्ष सा. संस्था), नवनीत पाटील (माजी अध्यक्ष गोल्डन ज्युबळी मंडळ),क्रांती म्हात्रे (खजिनदार मित्र परिवार), सुरेंद्र पाटील कॉन विभाग अध्यक्ष वेश्वी), युवा कार्यकर्ता रचित म्हात्रे (गुड्डू), आणि माडभुवन,निफाडवाडी, आदिवासी वाड्यांवरील सर्व आदिवासी बांधव आणि महिला भगिनींच्या उपस्थितीत हा अनोखा कार्यक्रम अगदी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button