क्राईम कॉर्नरब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूज

Breaking | रत्नागिरी रेल्वे स्थानकात चालत्या ट्रेनमधून तरुण पडला

  • विक्रेता आणि आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे गाडीखाली जाता जाता वाचला

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकात आज मोठी दुर्घटना घडताना सुदैवाने टळली.चालत्या ट्रेनमधून बेजबाबदारपणे उतरणारा तरुण पडला आणि ट्रेन खाली जात होता.पण प्लॅटफॉर्मवर सेवेत असलेल्या दोन आर पी एफ आणि एक विक्रेत्याच्या सतर्कतेने त्याचे प्राण वाचले. गाडी खाली जातच आता या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

शनिवारी सकाळी एल टी टी – सावंतवाडी सकाळी 6 वाजून 41मिनिटांनी रत्नागिरी च्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर दाखल झाली.ट्रेन प्लॅटफॉर्म वर थांबण्यापूर्वीच यातील एक तरुणाने ट्रेन मधून उतरण्याचा प्रयत्न केला.या चुकीच्या प्रयत्नांत हा तरुण चालत्या ट्रेन च्या खाली येणार होता.पण तो पडताच प्लॅटफॉर्म वर कार्यरत असलेल्या कोकण रेल्वेच्या दोन आर पी एफ जवान आणि एका विक्रेत्याने सतर्कता दाखवत त्याला वेगाने बाजूला ओढले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले.कोकण रेल्वेचा आर पी एफ जवान रणजीत सिंह आणिमहेंद्र पाल तसेच विक्रेता वीर सिंग यांनी त्याला वेळीच ओढत ट्रेनखाली जाण्यापासून वाचवले.त्याच्याबरोबर प्रवास करीत असलेल्या प्रवाशांकडून मिळालेल्या माहिती नुसार हा तरुण गोळप रत्नागिरी येथील असल्याची माहिती पुढे आली आहे. या जखमी तरुणावर कोकण रेल्वेच्या पथकाने तात्काळ प्रथमोपचार केले आणि पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. प्लॅटफॉर्म वर कार्यरत दोन आर पी एफ व विक्रेत्यांनी समयसूचकता दाखवत केलेल्या हालचालीमुळे केवळ त्याचे प्राण वाचले.

या घटनेची दखल कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी तिघांचे ही विशेष कौतुक केले आहे.संतोष कुमार झा यांनी या तिघांना ही प्रत्येकी पाच हजार रुपयांचे अवॉर्ड जाहीर करून ते तात्काळ त्यांना प्रदान करण्यात आले आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button