राष्ट्रीय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे निधन
अहमदाबाद : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे निधन झाले. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आईची तब्येत बिघडल्याचे समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबाद येथे रूग्णालयात गेले होते. पंतप्रधान मोदी यांनी स्वत: सकाळी ६ वा. च्या सुमारास ट्वीटद्वारे याबाबत माहिती दिली. अगदी अलीकडेच पंतप्रधान मोदी यांनी आपल्या घरी जाऊन आईची विचारपूस करत त्यांच्यासोबत. काही काळ घालवला होता.