खेडचा जो. रूबेनसन परदेशी याला महाराष्ट्र प्रिमिअर लीग क्रिकेट संघात स्थान!
जो रोटरी स्कूलचा माजी विद्यार्थी

खेड : भारतातील नंबर वनची प्रादेशिक स्पर्धा समजल्या जाणार्या महाराष्ट्र प्रिमिअर लीग स्पर्धेत रोटरी इंग्लिश मीडिअम स्कूल खेडचा माजी विद्यार्थी जो. रूबेनसन परदेशी याची निवड झाली असून त्याला रत्नागिरी जेट्स या संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे.
खेडमधील रोटरी स्कूलचा माजी विद्यार्थी असलेला जो.रूबेन सन परदेशी याचे इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण रोटरी स्कूलमध्ये झाले असून बालपणापासून त्याला क्रिकेट खेळण्याची आवड होती. त्याची क्रिकेटमधील आवड पाहून शाळेकडूनही त्याला खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असे. दक्षिण आफ्रिकेचा प्रसिद्ध खेळाडू ए. बी. डिव्हिलियर्स हा त्याचा आदर्श खेळाडू असून त्याच्याप्रमाणे क्रिकेट खेळण्याचे त्याचे स्वप्न आहे.
महाराष्ट्र प्रिमिअर लीग स्पर्धेमध्ये निवड होण्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन महाटीम 20 स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे संघ व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त क्लब सहभागी होतात. यामधून रत्नागिरीच्या संघामध्ये जो रुबेन सन परदेशी याला आपले नशीब आजमावण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.
रोटरी स्कूलचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी जो.रूबेन सन परदेशी याचे कौतुक करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.