महाराष्ट्रराष्ट्रीयरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हलसायन्स & टेक्नॉलॉजी
Indian Railway | ‘टाकाऊतून टिकाऊ’… रेल्वेच्या कालबाह्य डब्यापासून साकारले उपहारगृह!
गुवाहाटी : आसाम येथे नुकतेच उघडलेले रेल कोच रेस्टॉरंट ग्राहकांच्या चांगलेच पसंती उततरले आहे. विशेष म्हणजे हे उपहारगृह रेल्वेच्या एका कालबाह्य झालेल्या डब्याचा वापर करून तयार केले गेले आहे.
या हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना ब्रह्मपुत्रा नदीचे चित्तथरारक दृश्ये आणि अस्सल स्थानिक खाद्यपदार्थांचा अनोखा अनुभव देते. अशाप्रकारे टाकाऊ डब्यापासून रेल्वेने स्थानक परिसरात ग्राहकांना आकर्षित करून घेण्यासाठी अशा प्रकारचे रेस्टॉरंट उघडली आहेत.
गोव्यात कोकण रेल्वे मार्ग वर देखील अशा प्रकारचे रेल कोच रेस्टॉरंट साकारले आहे. या उपहारगृहात बसून चहा नाश्ता करणाऱ्या ग्राहकांना आलिशान रेल्वे बसल्याचा अनुभव घेता येतो. अशा प्रकारची उपहारगृहे ग्राहकांच्या पसंतीला उतरताना दिसत आहेत.