Konkan Railway | अवैध प्रवाशांकडून कोकण रेल्वेची २१ कोटी १७ लाखांची दंड वसुली
- उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांचा रेल्वेने केला गौरव
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या मार्गावर गेल्या वर्षभरात सर्वोत्तम कामगिरी करत अवैध प्रवास रोखण्यात यश मिळवलेल्या कोकण रेल्वेच्या तिकीट तपासनीसांना (टीटीई ) सन्मानित करण्यात आले आहे. या आर्थिक वर्षात तिकीट तपासनीसानी तब्बल 21 कोटी 17 लाख 80 हजार 741रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कामगिरीसाठी कोकण रेल्वेकडून या कर्मचाऱ्यांना गौरवण्यात आले.
कोकण रेल्वेमार्फत मागील काही काळापासून कोकण रेल्वेच्या मार्गावर अवैध आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी विरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत कोकण रेल्वेच्या मार्गावर काम करणाऱ्या तिकीट तपासनिसानी उत्कृष्ट कामगिरी करत 78115 कारवाया केल्या.यातून 21 कोटी 17 लाखाचा दंड वसूल करण्यात आला.
- हे देखील वाचा : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग धामणी येथे खचण्याची भीती
- दिल्ली आकाशवाणीकडून रत्नागिरीच्या अवधूत बाम यांना ‘टॉप ग्रेड’ प्रदान
- Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटेही उपलब्ध
गेल्या आर्थिक वर्षात मार्गावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व तिकीट तपासनिसांना ( टीटीई ) कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. संतोष कुमार झा यांनी गेल्या आर्थिक वर्षात तिकीट तपासनिसानी केल्या कामगिरीचे कौतुक केले.