ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल
Konkan Railway | कोकण रेल्वेचा दिल्लीत उत्कृष्ट कामगिरीसाठी गौरव
नवी दिल्ली : दिल्ली येथे दिग्गजांच्या उपस्थितीत आयोजित एका कार्यक्रमात कोकण रेल्वेला पर्यावरण, सामाजिक तसेच गव्हर्नन्स क्षेत्रातील कामगिरीसाठी ‘बेस्ट ईएसजी’ महात्मा पुरस्कार नुकताच प्रदान करून गौरवण्यात आले.
दिल्ली येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमात किरण बेदी यांच्या उपस्थितीत कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.पर्यावरण शाश्वतता, सामाजिक जबाबदारी आणि पारदर्शक प्रशासन यावर कोकण रेल्वे विशेष लक्ष देते. कोकण रेल्वेच्या याच कामगिरीची दखल घेऊन दिल्लीत हा नुकताच पुरस्कार प्रदान करण्यात आला.