ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र
Mumbai-Goa highway|मुंबई-राष्ट्रीय महामार्गावर तेलवाहू टँकर उलटला ; तेलाची गळती सुरु
माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी रवाना
नाणीज : मुंबई गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावरील आंजणारी ता.लांजा येथील घाटीमधील तीव्र उतारावर तेलाने भरलेला टँकर उलटून ऊन महामार्गावर तेल गळती सुरू झाली आहे. हा अपघात गुरुवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडला.
महामार्गावर घडलेल्या या अपघाताची माहिती मिळताच हातखंबा येथील महामार्ग पोलीस तसेच जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानाची रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आहे गंभीर चालकाला लांजा येथील ग्रामीण रुग्णालय दाखल केले आहे. टँकर मुंबईवरून गोव्याच्या दिशेने चालला होता.