विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी आत्मपरीक्षणाची गरज : जिल्हा न्यायाधीश डाॕ. अनिता नेवसे
- आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त चिपळूणमधील डी.बी.जे. कॉलेजमध्ये रॅगिंग विरोधी कायद्याबाबत मार्गदर्शन
रत्नागिरी दि.१३ (जिमाका):- विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी आत्मपरीक्षणाची गरज असल्याचे मार्गदर्शन जिल्हा न्यायाधीश डाॕ. अनिता नेवसे यांनी केले.
आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त तालुका विधी सेवा समिती, जिल्हा न्यायालय-१, डी.बी.जे. महाविद्यालय चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय रॅगिंग विरोधी कायद्याबाबतचे मार्गदर्शन शिबीर झाले. त्यावेळी डाॕ नेवसे बोलत होत्या.
या कार्यक्रमात जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी आंतरराष्ट्रीय युवा दिवस व रॅगिंग विरोधी कायदे याबाबत विद्यार्थी व विद्यार्थींनींना मार्गदर्शन केले. त्यांनी कॉलेजमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींना रॅगिंग या कायद्याची सखोल माहिती दिली. रॅगिंगमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना जाती वाचक, त्यांच्या रंगावरून, त्याला कोणतीतरी कृती करायला लावून, एखादी अश्लिल चित्रफित दाखविणे अशी कृत्ये करणे रॅगिंगचे प्रकार आहेत. अशी कृत्य जर एखादया विद्यार्थ्याडून अगर विद्यार्थ्यांनी मिळून असा त्रास दिला तर हे कृत्य करणे कायद्याने गुन्हा आहे. याकरिता शिक्षा आहे. याची माहिती दिली. नंतर त्यांनी कविता वाचनाने समारोप केला.
यावेळी नयना पवार, उपाध्यक्ष तालुका बार असोसिएशन, चिपळूण व पॅनल विधीज्ञ, तालुका विधी सेवा समिती, चिपळूण यांनी रॅगिंग विरोधी कायदे बाबत मुलांना सोप्या भाषेमध्ये मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. बापट, व्हाईस चेअरमन जीवन रेळेकर, इतर प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राध्यापक श्री भटुले यांनी केले.