ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रलोकल न्यूज
अणुस्कुरा घाटात कोसळलेली दरड हटवली ; वाहतूक सुरु

राजापूर : कोकणला कोल्हापूरशी जोडणारा अणुस्कुरा घाटात त्यामुळे कोसळलेली दरड हटवून हा रस्ता आता वाहतुकयोग्य बनवण्यात आला आहे. सायंकाळी मार्गावर दरड कोसळल्यानंतर युद्धपातळीवर प्रयत्न करून घाट रस्त्यावरील दरड हटवण्यात आली आहे.
घाटात पावसामुळे दरड कोसळल्याने ती हटवेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. या दुर्घटनेमुळे कोकणला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. गुरुवारी सायंकाळी कोसळलेल्या पावसामुळे घाटातील दरड मार्गावर कोसळली.
या संदर्भात जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार अणुस्कुरा घाटात कोसळलेली दरड आता पूर्णपणे हटवण्यात आली असून रस्त्यावरून वाहतूक सुरू देखील झाली आहे.