महाराष्ट्रशिक्षण
आबिटगाव येथे ‘कृषी उमेद’द्वारे बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक
आबिटगाव (चिपळूण) : आबिटगाव येथे गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवणच्या विद्यार्थिनी वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक कार्यक्रम शेतकऱ्यांसमवेत नुकताच राबवण्यात आला.
यामध्ये त्यात thiram या बुरशनाशकाचा वापर करून बीज प्रक्रिया कशी करावी याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. तसेच इतर बुरशीनाशक वापरून बीज प्रक्रिया कशी करावी ह्याचीही माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. यामध्ये ‘कृषी उमेद’ ग्रुपच्या कृषी कन्याचा समावेश होता.