महाराष्ट्र
उजनी धरणाचा कालवा फुटल्याने शेतीचे मोठे नुकसान
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात पाटकुल गावानजीक उजनी धरण्याचा उजवा कालवा कुठल्या ची माहिती मिळते आहे. कालवा फुटल्यामुळे आजूबाजूच्या शेतांमध्ये पाणी शिरल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळतात पाटबंधारे खात्याचे अधिकारी यंत्रणेसह घटनास्थळी रवाना झाले आहेत.
हा कालवा 112 किलोमीटर लांबीचा आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास कालवा फुटला. फुटलेल्या कालव्यात ५०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता.