महाराष्ट्रराजकीयलोकल न्यूज
उरण शहरातील समस्या बाबत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्याधिकारी समीर जाधव यांची भेट
समस्या सोडविण्याचे समीर जाधव यांचे आश्वासन
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2024/01/Uran-19-jan-780x470.jpg)
उरण दि १९(विठ्ठल ममताबादे ) : उरण नगर परिषदचे मुख्याधिकारी समीर जाधव यांची उरण नगर परिषद येथे नवीन नेमणूक झाल्यामुळे उरण शहर काँग्रेस तर्फे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या . त्याच वेळी उरण शहरातील प्रमुख स्थान असलेल्या विमला तलाव व वीर सावरकर मैदान ( लाल मैदान ) यांच्या बाबतीत तेथील समस्या व अडचणी व नागरिकांना होणाऱ्या त्रास या बाबतीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी समीर जाधव यांना सांगितले.
या समस्या त्वरित सोडविण्याची मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली.यावर मुख्याधिकारी समीर जाधव यांनी या बाबतीत सांगितले की, चर्चा करून त्या समस्या लवकरच दूर होतील. जनतेला त्रास होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ असे आश्वासन समीर जाधव यांनी उरण शहर काँग्रेस कमिटीला दिलें. यावेळी प्रकाश पाटील अध्यक्ष उरण शहर काँग्रेस कमिटी,बबन कांबळे माजी नगरसेवक, जीतेश म्हात्रे, नाहिदा पटेल, गुफराण तुंगेकर, देवीदास थळी आदी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.