उरणमधील शासकीय कार्यालयात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी
उरण, (विठ्ठल ममताबादे) : शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या मागणीनुसार व शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनातर्फे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शासकीय कार्यालये, नीम शासकीय कार्यालये, विविध शासकीय महामंडळे आदि ठिकाणी महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात येवु लागली. त्याच अनुषंगाने उरणमध्येही शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे पदाधिकारी बालाजी हेड्डे, विठ्ठल ममताबादे यांनी विविध शासकीय कार्यालयांशी संपर्क साधून लेखी निवेदने देउन जयंती साजरी करण्या बाबत विनंती केली होती त्याला शासकीय कर्मचा-यांनी योग्य प्रतिसाद दिला. उरण मध्ये सन २०१५ पासून तहसील कार्यालय, नगर परिषद, पंचायत समिती आदि ठिकाणी शासकीय महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात येवु लागली.
दरवर्षी प्रमाणे उरणमध्ये याहीवर्षी महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. उरण तहसील कार्यालयात तहसीलदार उद्धव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी सूर्यवाड महसूल सहाय्यक. अनिल चासकर महसूल सहाय्यक, दत्तात्रेय भोपी शिपाई .व इतर कर्मचारी यांनी महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली. तर पंचायत समितीमध्ये श्री. डाबेराब. सहाय्यक गटविकास अधिकारी, जितेंद्र चिर्लेकर प्रशासन अधिकारी, विनोद मिंडे विस्तार अधिकारी, श्रीमती संपदा पेढवी, उल्हास पाटील, श्रीमती पालकर, श्रीमती समीक्षा ठाकूर, श्रीमती कविता सोनारघरे, श्रीमती मगर आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महात्मा बसवेश्वर जयंती साजरी केली.
उरण नगर परिषद मध्ये मुख्याधिकारी समीर जाधव, बिपीन निकम, हरेश तेजी, सचिन नांदगावकर, दिपक ढेंबरे , नरेन्द्र साळवी, संतोष देवरे, धनंजय आंब्रे , सुवर्णा काळे, श्रद्धा गोडे, अंकिता इसाळ , जयेश वत्सराज , कांचन तारेकर,मनिषा उमते, ज्योत्स्ना पाटील,नितीन मोहिते आदि अधिकारी कर्मचारी वर्गांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करून महात्मा बसवेश्वर जयंती साजरी केली.एकंदरीतच महाराष्ट्र शासनाच्या शासकीय परिपत्रका नुसार उरण मधील विविध शासकीय कार्यालयात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली. उरण मधील विविध शासकीय कार्यालयात दरवर्षी महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत असल्याने शिवा संघटनेचे पदाधिकारी बालाजी हेड्डे,विट्ठल ममताबादे यांनी तहसील कार्यालय,पंचायत समिती, नगर परिषद आदि शासकीय कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी वर्गांचे आभार मानले आहेत.