महाराष्ट्रलोकल न्यूज
कृषि व पदुम विभाग, मंत्रालयीन उपसचिव प्रतिभा पाटील यांची सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राला भेट
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2024/12/IMG-20241230-WA0036-780x470.jpg)
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याच्या कृषि व पदुम विभाग, मंत्रालयाच्या उपसचिव श्रीम. प्रतिभा पाटील यांनी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे २८ डिसेंबर २०२४ रोजी सदिच्छा भेट दिली.
यावेळी त्यांच्यासोबत श्री. विजय सूर्यवंशी, चिफ मॅनेजर, माझगाव डॉक लिमिटेड, मुंबई हेही उपस्थित होते. यावेळी सागरी जीवशास्त्रीय रत्नागिरी संशोधन केंद्र, रत्नागिरीचे डॉ. आसिफ पागारकर, सहयोगी संशोधन अधिकारी (प्राध्यापक कॅस) यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे यथोचित स्वागत केले व यावेळी त्यांनी संशोधन केंद्राचा आढावा सादर केला.
यावेळी श्रीम. प्रतिभा पाटील यांनी मत्स्यालयास भेट दिली असता आपणास वेग-वेगळे प्रकारचे विविध मासे पहायला मिळाले त्याबद्दल उत्तम अनुभव आल्याचे नमूद केले.