कृषीसंजीवनी संघातर्फे वहाळमध्ये कृषी दिन उत्साहात साजरा

सावर्डे : डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली सलग्न, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण विद्यालयाद्वारे, ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांमध्ये कृषी संजीवनी संघाने १ जुलै रोजी वहाळ येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनाचे आयोजन केले.
यावेळी गोविंदरावजी निकम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कदम, प्राध्यापक, श्री. कांबळे ,मोहिरे, मेथे , पिंजारी , तसेच गावचे उपसरपंच आनंदा सपकाळ, ग्रामसेवक बजरंग हराळे, ग्रामपंचायत सदस्य, दिनेश घोरपडे, तन्वी साठे, रसिका पाडावे, पूजा करजेकर, वहाळचे प्रगतशील शेतकरी तसेच महिला वर्ग आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ही कृषीदिंडीने झाली. यामध्ये जि.प शाळा वहाळ तसेच न्यू इंग्लिश स्कूल वहाळ यातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. विद्यार्थी व कृषीकन्यांनी, जय जवान जय किसान,एकच ध्यास शेतकऱ्यांचा विकास, आम्ही जातीचे शेतकरी खातो कष्टाची भाकर, इडा पिडा टळु दे बळीच राज्य येऊ दे, सेंद्रिय शेती समृद्ध शेती अशा अनेक घोषणा दिल्या. कृषिकन्यांनी कृषी दिनानिमित्त वहाळ शाळेत अनेक स्पर्धांचे आयोजन केले व व चिमुकल्यांचे बक्षीस वितरण त्यांना छान छान भेटवस्तू देऊन करण्यात आले.
यावेळी वहाळ गावातील प्रगतशील, आदर्श शेतकऱ्यांचा सत्कार कृषी कन्यांनी साजरा केला. कार्यक्रमांमध्ये प्रगतशील शेतकऱ्यांनी आजचा शेतकरी व त्याची दयनीय अवस्था यावर विचार मांडले. शेतकऱ्यांना नवनवीन उपकरणांची माहिती मिळावी यासाठी कृषीकन्यांनी कृषी प्रदर्शन आयोजित केले. कार्यक्रमात समस्त शेतकरी, ग्रामस्थ आणि शिक्षकांनी कृषिकन्यांचे तोंड भरून कौतुक केले. यामध्ये खुशी गडा, तेजश्री पवार, प्रतिक्षा मोरे,साक्षी चव्हाण, रीया कोचरेकर, स्वरूपा पाटील, अनुराधा पाटील, साक्षी साबळे, अंकिता जाधव, स्नेहल निकम, प्रज्ञा साळवी, मधुरा रेगे या कृषीकन्या उपस्थित होत्या.