ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीय
केंद्रीय नौकानयन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्यासोबत भारतीय मजूर संघाची बैठक

उरण दि १० (विठ्ठल ममताबादे ) : नवी दिल्ली येथे केंद्रीय नौकानयन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यासोबत कामगारांच्या विविध प्रश्नावर भारतीय मजदूर संघाची बैठक संपन्न झाली.
या बैठकीमध्ये मागील वेतन करारातील कामगारांच्या हिताचे पेंडिंग राहिलेले प्रश्न तसेच कॉन्ट्रॅक्ट लेबर यांचे सेवानिवृत्तीचे वय वर्ष साठ करावे आणि विविध पोर्ट मधील कामगारांच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली.
या बैठकीत भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय महामंत्री रवींद्र हिमते, पोर्ट महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील, महासंघाचे अध्यक्ष श्रीकांत राय, संतोष प्रधान विविध कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.