चिपळूणच्या युनायटेड हायस्कूलचा जिल्हा कबड्डी सर्धेत दबदबा

चिपळूण : क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्य कार्यालय रत्नागिरी आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा क्रीडा संकुल डेरवण येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये 14 वर्षे वयोगटांमध्ये मुलींच्या संघाने अंतिम विजय मिळवून रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. या संघाची निवड सातारा येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.
अंतिम सामना युनायटेड हायस्कूल चिपळूण आणि नव भारत हायस्कूल खेड यांच्या मध्ये झाला 4 गुणांनी हा सामना युनायटेड हायस्कूल ने जिंकला व आपली यशाची परंपरा कायम राखली या संघामध्ये कु. श्रीया हुंबरे हिने चतुरस्त्र खेळी करून संघाला विजय मिळवून दिला तिला खुशी जोगले, वैष्णवी महाडीक, ईश्वरी महाडीक, ऋतुजा नलावडे, आर्या लोटेकर, तनिष्का कांबळी, श्रुती पोसनाक, श्रेया खाडे, श्रेया कदम, सलोनी वाटेकर यांची उत्तम साथ लाभली.
या सर्व खेळांडूना क्रीडाशिक्षक श्री. समीर कालेकर,बाबु जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर श्री खेतमल चौरे सर व सौ. सोळुंखे मॅडम यांनी व्यवस्थापक म्हणून भूमिका पार पाडली. यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .स्वप्नाली पाटील, उपमुख्याध्यापक श्री. संजय बनसोडे, पर्यवेक्षक संदीप मुंढेकर व परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या सर्व संस्था चालकांनी शुभेच्छा दिल्या आणि कौतुक केले.