चैत्यभूमीवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबईत चैत्यभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या महापरिनिर्वाणदिन कार्यक्रमात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले.
एक उत्तुंग अभ्यासक, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ, समाजसुधारक आणि राजकीय दूरदृष्टी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्या राष्ट्रासाठीचे योगदान अतुलनीय आहे. त्यांची दृष्टी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनाची होती.
– राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन.
यावेळी त्रिशरण बुद्धवंदना पार पडली. मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. माजी खासदार डॉ. जाधव यांच्या ‘भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले