महाराष्ट्र
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ
अलिबाग : जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर ता.माणगाव येथे इयत्ता सहावी प्रवेशासाठी https://cbseitms.rcil.gov.in/nvs/ या संकेतस्थळावर ऑनलाईन फॉर्म भरण्यास दि.8 फेब्रुवारी 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्यास दिलेल्या मुदतवाढीचा विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी लाभ घ्यावा आणि जिल्ह्यातून अधिकाधिक संख्येने ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे, असे आवाहन प्राचार्य, के.वाय.इंगळे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी श्री.संतोष आर. चिंचकर, मो.9881351601, श्री.सतीश जमदाडे, मो.9890343452/9284669382, श्री.केदार र. केंद्रेकर, मो.9423113276/7038215346 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.