डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेला ११ जुलैपर्यंत मुदतवाढ
रत्नागिरी दि. ६ : डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी यापूर्वी मदरसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक 30 जुन होता. त्यामध्ये बदल होवून सदर प्रस्ताव सादर करण्यासाठी आता 11 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र मदरासांनी आपले प्रस्ताव दिनांक 11 जुलैपर्यंत विहित मुदतीत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा नियोजन समिती विभागाकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी, सत्यविनायक मुळये यांनी केले .
या योजनेच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे :- अल्पसंख्याक समाजाचे (मुस्लीम, बौध्द, ख्रिश्चन, जैन, शीख, पारशी व ज्यू) किमान ७० टक्के विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे. शासन मान्यता प्राप्त अपंगाच्या शाळांमध्ये किमान ५० टक्के अल्पसंख्याक विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे. महा नगरपालिका व जिल्हापरिषदा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधीपत्याखाली चालविण्यात येत असलेल्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालये व अपंग शाळा या योजनेसाठी पात्र असणार नाहीत.
यापुर्वी या योजनेंतर्गत ५ वेळा अनुदान प्राप्त केलेल्या शाळा / संस्था अनुदानासाठी पात्र ठरणार नाहीत. एकाच इमारतीत / आवारात एकाच संस्थेच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अशा वेगवेगळया शाळा/महाविदयालये/ हे दिवसभरातील स्वतंत्र वेळापत्रकानुसार वेगवेगळया पाळीत/सत्रात भरत असतील आणि त्यांचे DIES CODE वेगवेगळे असतील अशा परिस्थितीत त्या इमारतीसाठी/ आवारासाठी या DIES CODE पैकी फकत् एकाच DIES CODE साठी अनुदान मंजूर करण्यात येईल.
जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका/नगरपरिषद शाळा व अपंग शाळा यांच्याकडून पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेंतर्गत कमाल रु. 2 लाख अनुदानाचा लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.मुदतीनंतर आलेल्या अर्जाबाबत विचार केला जाणार नाही.