दिवा-सावंतवाडी एक्सप्रेसच्या प्रवाशांसाठी आली महत्वाची बातमी!

२८ जुलै २०२५ पासून ‘या’ दोन रेल्वे गाड्यांना अतिरिक्त थांबे
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने २८ जुलै २०२५ पासून दोन महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना अतिरिक्त थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना आता आपल्या गंतव्यस्थानी पोहोचणे अधिक सोयीचे होणार आहे.
१) ट्रेन क्रमांक १०१०६/१०१०५ दिवा – सावंतवाडी रोड – दिवा एक्सप्रेस:
१) ट्रेन क्रमांक १०१०६/१०१०५ दिवा – सावंतवाडी रोड – दिवा एक्सप्रेस:
ट्रेन क्रमांक १०१०६ सावंतवाडी रोड – दिवा एक्सप्रेस: ही गाडी आता कोलाड स्थानकावरही थांबणार आहे. ही गाडी कोलाडला दुपारी १६:२९ येऊन १६:३० वाजता सुटेल. तर त्या आधी अंजनी स्थानकावर ही गाडी दुपारी दोन वाजून सहा मिनिटांनी सुटेल.
२) ट्रेन क्रमांक १०१०५ दिवा – सावंतवाडी रोड एक्सप्रेस: ही रायगड मधील कोलाड स्थानकावर सकाळी नऊ वाजून 16 मिनिटांनी येईल. एक मिनिटांचा थांबा घेऊन ही गाडी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल.
हे नवीन थांबे २८/०७/२०२५ पासून लागू होतील.
प्रवाशांसाठी आवाहन
या ट्रेनच्या विस्तृत थांब्यांसाठी आणि वेळेसाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी किंवा NTES ॲप डाउनलोड करावे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या नवीन सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.