महाराष्ट्रराजकीयराष्ट्रीय
देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार!
मुंबई : देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस हे
महाराष्ट्राच्या प्रगतीला दिशा देणारे अतिशय संयमी, दूरदर्शी आणि कार्यक्षम असे नेतृत्व मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या समारंभात तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थिती हा शपथविधी सोहळा पुढील काही तासांनी होणार आहे.
मुंबई,आझाद मैदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांना राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे आज दुपारी ३:०० वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ देणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री तसेच अन्य मंत्रिमंडळ सदस्यांनाही राज्यपाल शपथ देणार आहेत. महायुतीमधील इतर सदस्यांना राज्यपालांकडून शपथ दिली जाणार आहे.