महाराष्ट्रराष्ट्रीय
ध्वजदिन निधी संकलन कार्यासाठी कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख यांचा गौरव
मुंबई : यावेळी गेल्या वर्षभरात ध्वज निधी संकलनाच्या कार्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हस्ते विविध शासकीय व निमशासकीय संस्थांच्या प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक संस्थांनी तसेच व्यक्तींनी ध्वजनिधीला आपले योगदान दिले. ध्वजदिन निधी संकलनातील कार्यासाठी कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख यांचा देखील गौरव मूर्तींमध्ये समावेश आहे.
कोकणचे विभागीय आयुक्त राजेश देशमुख, नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुंबईचे जिल्हाधिकारी संजय यादव, यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया आदींना यावेळी स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.