महाराष्ट्र
नवीन वर्षात ‘या’ प्रकरणांचे हिशोब चुकते करणार : किरीट सोमय्या
मुंबई : भाजपचे नेते, ‘हातोडा’फेम किरीट सोमय्या यांनी नववर्षात आपल्या निशाण्यावर सुमारे अर्धा डझन प्रकरणे ठेवली आहेत. नवीन वर्षात या सर्व प्रकरणांचा हिशोब चुकता करावा लागणार असल्याचा इशारा सोमय्या यांनी संबंधितांना दिला आहे.
रायगड जिल्ह्यातील कोरलाई येथील 19 बंगलो प्रकरणासह, महाविकास आघाडीमधील माजी मंत्री अनिल परब, हसन मुश्रीफ, असलम खान यांचे स्टुडिओ, किशोरी पेडणेकर यांचे एस सदनिका प्रकरण तसेच मुंबई महानगरपालिकेतील गैरव्यवहार किरीट सोमय्या यांच्या निशाणीवर आहेत.
वरील सर्व प्रकरणातील कथित घोटाळया प्रकरणी नवीन वर्षात दिनांक एक जानेवारी 2023 पासून पावले उचलली जाणार असल्याचे सोमय्या यांनी ट्विटर वरील आपल्या संदेशात म्हटले आहे.