उद्योग जगतमहाराष्ट्रराजकीयलोकल न्यूज

न्हावा ग्रामस्थांना विमानतळ प्रकल्पात नोकरीत प्राधान्य मिळायला हवे

आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे मत

उरण दि ३ (विठ्ठल ममताबादे ) : १९८० च्या दशकात पनवेल तालुक्यातील न्हावा येथे माझगाव डॉक आणि ओएनजीसीसारखे प्रकल्प आल्यावर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला होता. त्यामुळे एकेकाळी न्हावा गावाने जिल्ह्यातील हजारो तरुणांना रोजगार दिला. आज येथील तरुण उच्चशिक्षित झालाय, पण रोजगार नाही. त्यामुळे प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नोकरीत सर्वाधिक प्राधान्य न्हावा गावातील तरुणांना मिळायला हवे, असे मत आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी न्हावा येथे व्यक्त केले.

न्हावा येथील तरुणांनी ‘श्री गावदेवी अवजड वाहतूक वेल्फेअर असोसिएशन’ची स्थापना केली. असोसिएशनच्या नामफलकाचे उद्घाटन महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते झाले. त्यावेळेस ते बोलत होते.


यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष काशिनाथ ठाकूर, उपाध्यक्ष गणेश ठाकूर, खजिनदार चंद्रकांत पाटील, सचिव चंद्रकांत भोईर, आशीष पाटील, गजानन म्हात्रे, भगवान पाटील, महेंद्र पाटील, मीनाक्षी पाटील, विजया ठाकूर, सरपंच विजेंद्र पाटील, उपसरपंच शैलेश पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button